Inaugurated by main district and session judge Mahendra Mahajan

offline · completed
Inaugurated by main district and session judge Mahendra Mahajan
26-03-2024 01:00:00 · Pune
जागतिक महिला दिनानिमित्त पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे बार असोसिएशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ’अहिल्या सेल - सर्वांसाठी कायदेशीर मदतीचा हात’ या उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या हस्ते पार पडले. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील या कार्यक्रमावेळी, व्यासपीठावर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, ग्रामीणचे जिल्हा पोलिस उपअधिक्षक युवराज मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, बाल कल्याण संस्थेच्या चेअरपर्सन राणी खेडीकर, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पठाणिया, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष खामकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव डॉ. दिपक डोंगरे आदी उपस्थित होते.




